
दोडामार्ग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग च्या वतीने खुली मोठया व लहान गटात वत्कृत्व आणि निबंध स्पर्धा चे दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग ( ITI ) याठीकाणी आयोजन करण्यात आले आहे.
दोडामार्ग तालुक्यात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. जयंती उत्सावाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग च्या वतीने खुली मोठया व लहान गटात वत्कृत्व आणि निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकांनी दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत तर निबंध स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकांनी दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले निबंध पाठवीण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे. दिलेल्या तारखे नंतर नावं नोंदणी केली जाणार नाही असे आयोजकांनी सांगितले आहे. वक्तृत्व स्पर्धा दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग ( ITI ) याठीकाणी सकाळी ठीक १० वाजता सुरु होणार असून स्पर्धाकांनी वेळेच्या अगोदर अर्धा तास उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
वक्तृत्व स्पर्धा (लहान गट इ. ०५ वी ते १० वी वेळ मर्यादा ७ मिनिट ) :- विषय - १) "प्रगत भारताचा पायाः महामानवाचा विचार", २) "त्यागाची उत्तुंग माऊलीः वंदनीय माता रमाई", ३)"शाळेबाहेरील बाक ते संविधानाचा मसुदाः एक प्रेरणादायी प्रवास"
(मोठा गट इ. ११ वी ते १५ वी वेळ मर्यादा १० मिनिट ) विषय - १) "माणुसकीचा हुंकारः डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीची यशोगाथा", २) "भारतीय संविधानः लोकशाहीचा प्राण आणि राष्ट्रवादाचा आधार", ३) "बुद्ध आणि त्यांचा धम्मः वैश्विक शांततेचा एकमेव मार्ग"
निबंध स्पर्धा (लहान गट इ. ०५ वी ते १० वी. शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द ) विषय - १) "मानवतेचे पुजारीः बहुजन प्रतिपालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर", २) "भीमरावांच्या यशाचा भक्कम पायाः आदर्श पिता रामजी सकपाळ", ३) "ज्ञानाचे प्रतीकः डॉ. बाबासाहेबांचा प्रगत शैक्षणिक दृष्टिकोन"
(मोठा गट इ. ११ वी. ते १५ वी. शब्द मर्यादा ७०० ते ८०० शब्द ) विषय - १) "स्त्री मुक्तीची सनदः हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर", २) "विकास नीतीचे शिल्पकारः डॉ. आंबेडकरांचे जल, विद्युत आणि कामगार धोरण", ३)"संविधानिक मूल्ये आणि आजचा भारतः एक चिंतन"
वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेसाठी पारितोषिके पुढील प्रमाणे = लहान गट :- प्रथम पारितोषिक :- १००० रुपये सहभाग प्रमाण पत्र,स्मृती चिन्ह, द्वितीय पारितोषिक :- ७०० रुपये सहभाग प्रमाण पत्र, स्मृती चिन्ह, तृतीय पारितोषिक :- ५०० रुपये सहभाग प्रमाण पत्र,स्मृती चिन्ह
मोठा गट :- प्रथम पारितोषिक :- १५०० रुपये सहभाग प्रमाण पत्र,स्मृती चिन्ह, द्वितीय पारितोषिक :- १००० रुपये सहभाग प्रमाण पत्र, स्मृती चिन्ह, तृतीय पारितोषिक :- ७०० रुपये सहभाग प्रमाण पत्र,स्मृती चिन्ह
तृतीय पारितोषिक :- ७०० रुपये सहभाग प्रमाण पत्र,स्मृती चिन्ह तसेच दोन्ही स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकाना सहभाग प्रमाण पत्र देवून गुणगौरव केला जाईल.
अधिक माहिती नावं नोंदणी आणि निबंध पाठविण्यासाठी संपर्क :-* आयु. बुध्दभूषण हेवाळकर 9112671161,आयु. रमाकांत जाधव 9423806365, आयु. शंकर जाधव 9763379306, आयु. अंकुश जाधव 94228 96644, विजय जाधव 7066800650 यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग यांनी केले आहे.











