
दोडामार्ग : तालुक्यातील हत्ती तळकट कोलझर सोडून आता पुन्हा परमे येथे पोहचले आहेत. रविवारी रात्री श्रीकांत नारायण गवस यांच्या शेतीत जाऊन भाताचे मोठे नुकसान केले आहे. हत्ती आल्याची बातमी गावात समजतात ग्रामस्थांनी टाॅर्च मारून हाकलून लावले.
काही दिवस तालुक्यातील तळकट कोलझर, भिकेकोनाळ गावात वास्तव्य करून असलेले हत्ती आता पुन्हा तिलारीच्या दिशेने प्रवास करू लागले आहेत. परमे गावात मध्यरात्री २ हत्ती श्रीकांत गवस यांच्या शेतात घुसले व भात शेतीचे मोठे नुकसान केले.