
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सुंदरवाडी वीज बिल भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.या सेवेचा शुभारंभ माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, प्रत्येक बचत गटांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरु केल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल व सुंदरवाडी शहर संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुंदरवाडी शहर संघाच्या वीज बिल भरणा केंद्राचे उदघाटन करताना मा. नगरसेविका दिपाली भालेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे , माजी नगरसेविका दिपाली सावंत, श्री एकनाथ पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.