इलेक्ट्रिशियन शेखर साटम यांचे निधन..!

Edited by:
Published on: November 19, 2023 10:36 AM
views 539  views

कणकवली :  शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी इलेक्ट्रिशियन शेखर विष्णू साटम ( 40 ) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, वहीनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. शेखर हे लायटिंगचे कामे करायचे. बांधकरवाडी स्वयंभू मंदिराच्या प्रत्येक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा तसेच कणकवली, जानवली, कुंभवडे, हरकुळ ब्रु., मुडेश्वर तसेच  वरवडे, याठिकाणी मंदिरातील उत्सवानिमित्त परिसरात  विद्युत रोषणाई करायचे. त्यांच्या इलेक्ट्रिकल्स व्यवसायामुळे तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वत्र  परिचित . त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता.