वेंगुर्ला- रामघाटात विजेच्या तारांनी घेतला पेट

सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Edited by: दिपेश परब
Published on: June 27, 2023 14:56 PM
views 70  views

वेंगुर्ले : शहरातील रामघाट येथील बबलू आडेलकर यांच्या घरासमोरून जाणाऱ्या ११ के. व्ही. विजेच्या तारांनी अचानक पहाटे अचानक पहाटे ४.३० वाजता पेट घेतला दरम्यान येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

   येथील बबलू आडेलकर यांच्या घरासमोरून ११ के. व्ही. विद्युत लाईन जातात. आज (२७ जून) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून पेटताना दिसल्या. त्यामुळे तत्काळ याची कल्पना बबलू आडेलकर यांनी ग्रां.प. सदस्य हेमंत गावडे व संजय परब याना दिली. लगेच त्यांनी वीज वितरण च्या वेंगुर्ले कार्यालयात धाव घेतली आणि तेथील कर्मचाऱ्यांना कळविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन लगेच तेथील वीजपुरवठा खंडित केला. परिणामी तारेला लागलेली आग आटोक्यात आली आणि यामुळे मोठा अनर्थ टळला.