शासनाच्या पत्रकार अधीस्वीकृती समितीवर गजानन नाईक यांची निवड...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 11:24 AM
views 104  views

सावंतवाडी :  महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्ती केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधीकस्विकृती समितीवर सावंतवाडी चे जेष्ठ पत्रकार गजानन  राजाराम नाईक यांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या वतीने आज शासकीय आदेश काढून समितीची घोषणा केली आहे .यामध्ये राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विविध विभागीय समित्यांवर मराठी पत्रकार परिषदेच्या नऊ पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

तर, विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या दिपक केतके (मुंबई विभाग), अनिल महाजन (औरंगाबाद विभाग), विजयकुमार जोशी (लातुर विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), विजयसिंह होलम (नाशिक विभाग), गजानन नाईक (कोल्हापूर विभाग), राजेंद्र काळे (अमरावती विभाग), अविनाश भांडेकर (नागपूर विभाग), हरिष पाटणे (पुणे विभाग) या नऊ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, राज्य अधिस्वीकृती समितीवर इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागात विनोद जगदाळे व राजेश माळकर यांची नियुक्ती करण्यात आलीय.

प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ हे उक्त संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक १९ सप्टेंबर २००७ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले आहेत. सदरहू नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.  त्यानुसार राज्य अधिस्वीकृती समितीवर २७ सदस्यांची व ९ विभागीय अधिस्वीकृती समित्यांवर ४५ सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

या समितीत जेष्ठ पत्रकार गजानन नाईक,  श्री . निखिल पंडितराव , श्री सुखदेव गिरी ,

 प्रताप सरनाईक, तसेच  श्री .समीर देशपांडे यांचाही समावेश आहे.

श्री गजानन नाईक हे हे ज्येष्ठ पत्रकार असून गेली पन्नास वर्षे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारितेत सक्रिय आहेत  मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

गेले वर्ष दोन वर्ष या समितीच्या नियुक्ती रखडल्याने अनेक पत्रकारांच्या  अधीस्वीकृती अडकल्या होत्या .त्या आता मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे चे मुख्य विश्वस्थ श्री. एस. एम. देशमुख विश्वस्त किरण नाईक ,अध्यक्ष शरद पाबळे ,.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश  तोरस्कर परिषद प्रतिनिधी गणेश जेठे विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार आदींनी अभिनंदन केले आहे.