निवडणूक खर्च निरीक्षक दिव्या के.जे सिंधुदुर्गात दाखल

Edited by: संदीप देसाई
Published on: October 22, 2024 13:49 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक (Expenditure observer) दिव्या के.जे जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.  त्यांचा मोबाईल क्रमांक. 9359688515 आणि ई-मेल आयडी [email protected]  असा आहे.