माणगाव हायस्कूल संस्थेची पहिल्यांदाच त्रैवार्षिक निवडणूक

९ जांगासाठी २९ उमेदवार रिंगणात : चुरसपूर्ण मतदान
Edited by:
Published on: May 31, 2025 17:29 PM
views 174  views

कुडाळ : माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक आज होत आहे. आज सकाळपासून चुरसपूर्ण मतदानास माणगाव हायस्कूल येथे सुरूवात झाली. पाच वाजेपर्यंत माणगाव हायस्कूलच्या त्रैवार्षिक निवडणूकीत एकुण 783 मतदानापैकी 372 मतदान झाले आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलशी थेट लढत विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलशी तसेच बाळा आगलावे, विजय पालकर, जोसेफ डॉटन्ट, विनोद चव्हाण, पांडू सावंत, एकनाथ केसरकर यांच्या वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलशी होत आहे.

या तिरंगी लढती बरोबर दोन अपक्षांनी शड्डू ठोकला असून, संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणूक पार पडत आहे. माणगाव हायस्कूलच्या आतापर्यंतच्या इतिहासाच्या काळात माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव या संस्थेची गेली कित्येक वर्षे बिनविरोध निवड झाली होती. मात्र पी. टी. आर मिळण्याच्या दृष्टीने धर्मादाय आयुक्त यांनी थेट निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर धर्मादायक आयुक्ताच्या आदेशानुसार ही निवडणूक संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  तथा पॅनल प्रमुख सगुण धुरी, श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलचे प्रमुख, शिक्षण अग्रणी पॅनल असून विद्यमान संचालक चंद्रशेखर शिवराम जोशी तर  तिसरे पॅनल माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल उर्फ बाळा हरी आगलावे यांनी मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतर बोलताना विजयाचा दिवा केला आहे.

पाच वाजता मतदान संपले तेव्हा 783 पैकी 372 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारनंतर मतदान प्रकिया धिम्यागतीने झाली. मतदारांना बाहेर काढण्यसाठी जोरदार चुरस पहायला मिळाली.  विद्यमान अध्यक्ष तथा श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल प्रमुख सगुण धुरी, शिक्षण अग्रणी पॅनल प्रमुख चंद्रशेखर जोशी, श्री. वासुदेवानंद सरस्वती पॅनल प्रमुख बाळा आगलावे यांसह एकुण 29 उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले आहे. थोडयाच वेळात ६ वाजता माणगाव हायस्कूल मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात होणार आहे.