
देवगड : देवगड तालुक्यातील गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाथव(75) यांनी आजाराला कंटाळून येथील घराच्या पडवीतच नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ৪ ते 9.30 वा.सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाधव हे दमा आजाराने आजारी होते. 18 नोब्हेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमाररास त्यांनी घराच्या पडवीतील लोखंडी खिडकीच्या पट्टीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांची पत्नी रत्नप्रभा भिवा जाधव(70) यांनी देवगड पोलिस स्टेशन ला दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आशिष कदम करत आहेत. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी देवगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.