
वैभववाडी : शिराळे येथील नारायण केशव पाटील (वय ७०)हे काल(ता.१) पासून बेपत्ता झाले आहेत. पत्नी वैशाली पाटील यांनी पती बेपत्ता असल्याची फिर्याद पोलीसात दिली आहे.
शिराळे येथे पाटील दांपत्य राहतात.मंगळवारी सायंकाळी ४ वा.नारायण पाटील हे वैभववाडीला जातो असं पत्नी वैशालीला सांगून निघाले. मात्र सायंकाळी ते घरी पुन्हा आले नाहीत.वैशालीयांनी त्यांची सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु ते कोणाकडेही गेले नसल्याचे समजले. यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे.