
दोडामार्ग : संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री पिंपळेश्वर देवस्थानचा अठरावा वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा झाला. शहर परिसरा सहित तालुक्यातील श्री पिंपळेश्वरचे गावा गावातील अनेक भाविक पिंपळेश्वर समोर नतमस्तक झाले होते.
वझरे येथील वासुदेव भावे या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळेश्वर देवस्थान उत्सव समितीने ती सत्यनारायण महापूजेची सकाळच्या सत्रात आयोजन केले होते. रजत दिलीप कुमार राणे दांपत्याकरवी पूजा संपन्न झाली. दुपारच्या सत्रात भाविकांच्या माध्यमातून भव्य महाप्रसादाचे आयोजन झाले होते. सायंकाळी पाच वाजता गोव्यातील नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित झाला होता. शुभम नाईक,गितेश इंफाळकर,आतिश कारापुरकर, अनिल पंडित,दिगंबर गावस या भजन कलाकारांसमवेत मयंक पंडित या छोट्या बालकलाकाराने वाजवीलेले पख्वाजअक्षरशः कौतुकास्पद ठरले. संपूर्ण दिवसभर तीर्थप्रसादासाठी अनेक भाविकांची रीघ लागली होती. रात्री आठ वाजता आयोजित झालेल्या छावा या नाटकासाठी देखील तोबा गर्दी उसळली होती. यंदा चा हा 18 वा वर्धापन दिन उत्कृष्टपणे साजरा होण्यासाठी अजित चांदेलकर,नितीन मणेरिकर, विशांत परमेकर , सागर चांदेलकर, आनंद कामत, सुमंत मणेरीकर, प्रशांत केरकर, प्रवीण आरोंदेकर,प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर, सुधीर चांदेलकर, श्याम चांदेलकर, विलास मिरकर, संदीप मिरकर वगैरे अन्य बरेच जण सहभागी झाले होते.