
वेंगुर्ले : आजपासून सर्व देव देवतांचे आशीर्वाद घेऊन या वेंगुर्ला वासीयांच्या आशीर्वादासाठी सर्व उमेदवार जाणार आहेत. यापूर्वी सुद्धा भाजप वर वेंगुर्लेवासीयांनी विश्वास ठेवला होता. तसाच विश्वास यावेळी सुद्धा ठेवतील याची खात्री आहे. या शहराला एक विकसित शहर म्हणून ओळख द्यायची आहे. स्वच्छ सुंदर शहर म्हणून यापूर्वीच वेंगुर्ले नावारूपास आले आहे. हेच पुढे टिकवून ठेवणे व देशात एक रोल मॉडेल म्हणून शहराला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरोग्या सहित जनतेसाठी विविध सोई सुविधा या सर्वांवर भर देत असताना शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. वेंगुर्ले बंदरला विकसित करून देश विदेशातील पर्यटक याठिकाणी येतील व पर्यटन दृष्ट्या या शहराला भविष्यात अधिक विकसित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केली.
वेंगुर्ला नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप व २० नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लेची जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदेवता श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसहित भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, भूषण आंगचेकर , दाजी परब , ज्ञानेश्वर केळजी, समीर कुडाळकर, नामदेव सरमळकर, विलास कुबल, राजन केरकर, किरण कुबल, निलेश गवस, योगेश नाईक, सुदेश आंगचेकर ,गणेश माईणकर, सत्यवान परब , राजन केरकर , नितीन चव्हाण , मनवेल फर्नांडिस , सायमन आल्मेडा , शरद मेस्त्री , भानु मांजरेकर , रफिक शेख , पुंडलिक हळदणकर तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळो
मागील ५ वर्षासाठी वेंगुर्लेच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हला मिळाली होती. यावेळी सुद्धा ही संधी पुन्हा द्यावी असे साकडे देवतांच्या चरणी घालून प्रचाराला शुभारंभ केला आहे. मागील ५ वर्षात भाजपच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा आम्ही सदुपयोग केला करून अनेक विकासकामे केली. पुढील काळात सध्या सर्वात जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न म्हणजे रुग्णालय आहे. यासाठी सर्व सुविधा युक्त रुग्णालय बांधणे हा आमचा प्रथम मुद्दा असेल. त्याशिवाय अनेक विकासकामे आमच्या नजरेत आहेत ती मार्गी लावू.
हे आहेत भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार- दिलीप लक्ष्मण गिरप
नगरसेवक पदाचे उमेदवार
प्रभाग १ अ -मंजुषा महेंद्र आरोलकर, ब - रविंद्र रमाकांत शिरसाठ
प्रभाग २ अ- गौरी गणेश माईणकर, ब -प्रीतम जगन्नाथ सावंत,
प्रभाग ३ अ -विनायक सदानंद गवंडळकर, ब- गौरी सुदेश मराठे
प्रभाग ४ अ -आकांक्षा आनंद परब, ब- तातोबा उर्फ सुधीर महादेव पालयेकर
प्रभाग ५ अ - सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, ब- विनय अशोक नेरूरकर
प्रभाग ६ अ -रिया वासुदेव केरकर, ब - सदानंद तुळशीदास गिरप
प्रभाग - ७ अ - काजल किरण कुबल, ब- सचिन भगवान शेट्ये
प्रभाग ८ अ- श्रेया शैलेश मयेकर ब - प्रसाद विनायक गुरव
प्रभाग ९ अ- युवराज लक्ष्मण जाधव, ब- यशस्वी योगेश नाईक
प्रभाग १० अ - प्रणव बाबली वायंगणकर, ब- शीतल ज्ञानेश्वर आंगचेकर










