शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न

चेअरमन प्रमोद गावडे यांचं प्रतिपादन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 05, 2023 17:54 PM
views 42  views

सावंतवाडी : शासकीय भात खरेदी,खत विक्री व्यवसाया सोबत शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकरी - बागायतदारांच्या हिताच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घेण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे असे प्रतिपादन चेअरमन प्रमोद गावडे यांनी केले.


सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ उर्फ राजन रेडकर, संचालक प्रमोद सावंत, प्रवीण देसाई, ज्ञानेश परब, प्रभाकर राऊळ, दत्ताराम हरमलकर, आत्माराम गावडे, विनायक राऊळ, दत्ताराम कोळमेकर, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, गुरुनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे, व्यवस्थापक महेश परब, माजी चेअरमन बाबल ठाकूर आदी उपस्थित होते.


सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप बँकेच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे चेअरमन प्रमोद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या सभासदांचे भाग अल्प प्रमाणात आहेत. त्यांनी किमान दोनशे रुपये भाग वाढवून घ्यावा. तसेच मयत सभासद वारसांनी नोंद करून सहकार्य करावे. 

यावेळी ९७ घटनादुरुस्ती नुसार संस्थेच्या मयत, संपर्कात नसलेले व अक्रियाशिल सभासदांना जाहीर नोटीस देऊन संधी द्या आणि नंतर सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

यावेळी रमेश पई, गुरुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, सुभाष गावडे, सुरेश सावंत, प्रमोद परब, सुस्मीता देसाई, रमाकांत सावंत, रामचंद्र शिरसाट, भगवान जाधव, बाबल ठाकूर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश पई, गजानन सावंत, सुनील देसाई,अरूण गावडे, सुरेश गावडे, रवींद्र म्हापसेकर, बाबुराव कविटकर, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी वसंत केसरकर, एकनाथ नारोजी, आत्माराम राऊळ,अँड अनिल केसरकर, प्रभाकर राऊळ, सचिन केसरकर, प्रमोद परब, दिपक जाधव, सुरेश कासार, शिल्पा केसरकर, विनोद वराडकर, आनंद राऊळ, उत्तम राऊत, विजय बाईत अन्य मान्यवर सभासद उपस्थित होते.