
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांच्या सह महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडू मधील १ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यापुढे हे समाविष्ट झालेले किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी यांचा समावेश असुन सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांचा जागतिक वारसा स्थान मध्ये समावेश असला तरी भविष्यात वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार हि वेंगुर्ले येथील ऐतिहासिक वास्तू जागतिक स्तरावर प्रसिध्द करण्यासाठी मी प्रयत्नशील असून दि हायर या राष्ट्रीय इंग्रजी वेबसाईट वर पाच हजार शब्दांचा लेख अलिकडेच नेदरलँड्स येथील आंतरराष्ट्रीय भाषांतर तज्ञा हॅनी माॅनसिंग आणि डच पत्रकार रुबेन मालेकार यांच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहरात भविष्यात परदेशी पर्यटक वाढतील व पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर जगाच्या नकाशाच्या प्रकाश झोतात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय महावारसा समिती, सिंधुदुर्ग चे सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे उपाध्यक्ष व जनसेवा प्रतीष्ठानचे डॉ . संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार वेंगुर्ले येथील निवासी नायब तहसीलदार राजन गवस यांना दाखवताना केले. यावेळी दुर्गप्रेमी डॉ. प्रल्हाद मणचेकर, किल्ले पहारेकरी आनंद हिंडे उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांनी संरक्षण दिलेली, शिवरायांच्या स्वराज्यासाठी महत्वपूर्ण योगदान ठरलेली वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार भेटी संदर्भात मे व एप्रिल १६६३ सालात छत्रपती शिवाजी महाराज वेंगुर्ले येथे आल्याचा शिवचरित्रा मध्ये उल्लेख असुन शिवप्रेमी व दुर्गप्रेमी यांनी या भुईकोट किल्ला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्या साठी अधिक लक्ष दिले पाहिजे असेही डॉ. लिंगवत यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाने संचालक डॉ. विलास वहाने यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेल्या निवेदनाचा विचार करून वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन मुळ ढाचा कायम राखून या भुईकोट किल्ल्याची डागडुजी करून पुन्हा चेहरा प्राप्त करून दिलेला आहे. सध्या परदेशी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात आणले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीच्या माध्यमातून विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागतिक वारसास्थळ आता जागतिक वारसा स्थळ समिती भेटीच्यावेळी स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या होत्या तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समितीचे अध्यक्ष डॉ. उमेश झिरपे व कार्याध्यक्ष क्क्ऋषीकेश जाधव यांनी भारतातील बाराही किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले असंही त्यांनी यावेळी सांगितले. या बाराही किल्ल्यांचे टु दीड स्केल माॅडेल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या गिर्यारोहक स्वयंसेवकांनी अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण करून दिल्ली येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींना भेट दिलेल्या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनले होते.
बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश हि सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब असून महाराष्ट्र शासन व विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीमा राबविण्यालेल्या सामाजिक संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. संजिव लिंगवत व सचिव प्रा. एस्. एन् . पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.