
सिंधुदुर्गनगरी : होळी सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. त्याचबरोबर जनतेनेही सहकार्य करावे असे सांगतानाच जिल्ह्यात २० ते २१ ठिकाणी गावांमध्ये होळी सणावरून भांडणे आहेत. मात्र, ती सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. होळीचा सण साजरा करताना पर्यटक वा इतर कुणाकडून जबरदस्ती पैसे घेतले जाऊ नये, असे प्रकार घडू नये या साठी पोलिस म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे. तरीही जर असे प्रकार घडले तर आमच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था नीट नेटकी राहावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.