
कणकवली : महाराष्ट्र शासनाची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजना कणकवली शहरात प्रभावीपणे राबविणेसाठी कणकवली नगरपंचायत मा. मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका, मदतनीस व नगरपंचायत कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व अंगणवाडी केद्रावर व नगरपंचायत येथे मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून परिपूर्ण भरलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सोमवार दि. 08 जुलै 2024 पासून कणकवली शहरातील खालील ठिकाणी अर्ज स्वीकृती केद्र सुरु करण्यात आलेली आहेत. शाळा नं - 1 आचरा रोड, शाळा नं - 2 बांधकरवाडी, शाळा नं- 3 भालचंद्र नगर, शाळा नं - 4 पंचायत समितीच्या मागे, शाळा नं - 5 जळकेवाडी, सिद्धार्थनगर येथील सर्व अंगणवाडी मध्ये व नगर पंचायत येथे सकाळी 10.00 ते 5.00 वेळेत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरामध्ये जाहीर आवाहन व इतर माद्यमातुन प्रचार प्रसिद्धी करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. शहरातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.