दिक्षित फाउंडेशनच्यावतीने विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 22, 2024 09:58 AM
views 172  views

देवगड : कै.निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित यांच्या स्मरणार्थ दिक्षित फाउंडेशनच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरळ कलंबई व पुरळ हुर्शी या दोन प्राथमिक शाळेमधील होतकरु विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  निरंजन दिक्षित व ग्रामस्थांच्यावतीने  करण्यात आले आहे. 

शैक्षणिक सुविधांचा अभावी होतकरु विदयार्थी शिक्षणांपासुन वंचित राहू नये त्यांनाही उत्साहाने शिक्षण घेता यावे या उध्दार हेतूने दिक्षित फाउंडेशनच्यावतीने नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यांना स्कुलबॅग,वहया,छत्री,पेन,कंपासपेटी असे चांगल्याप्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पुरळ कलंबई जिल्हा परिष्द प्राथमिक शाळेमधील हे शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी व्यासपिठावरती दिक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दिक्षित,अयोध्याप्रसाद गावकर,पुरळ तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश देवळेकर,रघुनाथ मुळम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुजारे,मंदार तिर्लोटकर,शंकर राघव,सागर पुजारे,प्रकाश राघव,एकनाथ राघव,संजय मुळम,कलंबई शाळेचे मुख्याध्यापक मधुकर गुटटे आदी उपस्थित होते. तसेच पुरळ हुर्शी प्राथमिक शाळेमध्ये दिक्षित फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी निरंजन दिक्षित, सुरेश देवळेकर,मंदार तिर्लोटकर,माजी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर,धोंडु तिर्लोटकर,विकास करंदीकर,मुख्याध्यापक संध्याराणी झांबरे ग्रामपंचायत सदस्य संदिप थोटम व ग्रामसथ उपस्थित होते.