
सावंतवाडी : आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान हे गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले. पाचवी स्कॉलरशिप,आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्राविण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन वर्ग विनामूल्य होते.
प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तकेही भेट देण्यात आली होती. तसेच दिवाळीत किशोर अंक भेट देण्यात आला होता. विशेष म्हणजे आरवली येथील जीवन शिक्षण शाळेत देखील एक महिना गणित या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. तेथील मुख्याध्यापक सौ. वैभवी रायशिरोडकर, संजिवनी कोकितकर, प्रियदर्शनी म्हाडगूत आणि सविता सातपुते या शिक्षकवर्गाचे या कामी विशेष सहकार्य लाभले. सांगताप्रसंगी आरवली येथील १८ मुलांना कंपास बॉक्स भेट देण्यात आले. तर आजगाव येथील नऊ मुलांना दिलीप अंकुश पांढरे यांच्यातर्फे रायटींग पॅडस् भेट देण्यात आली. यावर्गांचे शैक्षणिक मार्गदर्शन विनय सौदागर यांनी केले. तर प्रकाश मिशाळ,एकनाथ शेटकर,अविनाश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.