
वैभववाडी : एडगांव वायंबोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या प्रज्ञा प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.निवडीनंतर आमदार नितेश राणे यांनी सौ. रावराणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
एडगाव वायंबोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा स्मृती पवार यांनी काही महीन्यांपुर्वी राजीनामा दिला होता.त्यांच्या या राजीनाम्यानंतर सोमवारी निवडणूक झाली.सौ.रावराणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर एडगाव येथे आलेल्या आमदार नितेश राणे यांनी नुतन उपसरपंच सौ रावराणे यांच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे,जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे,प्रमोद रावराणे, सुनिल रावराणे,नेहा माईणकर,प्राची तावडे, हुसेन लांजेकर यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.