
कणकवली : ख्रिसमस नाताळ सणाचे औचित्य साधून वेस्टर्न युथ कौन्सिलने इको फ्रेंडली गोठा रिल्स स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, गुजरात या ३ राज्यातील घेण्यात आली. या स्पर्धेत सिंधुदुर्गातील ४ युवक विजेते पदाचे मानकरी ठरले.
कणकवली तालुक्यातील कळसुली गावचे रुजाय इशेद फर्नांडिस प्रथम क्रमांक, पैरिश फणसवाडी फातीमा चॅपल (कळसुली), अरुलशॉन डिसोझा द्वितीय क्रमांक (सांवतवाडी), अँथोनी दुमींग डीसोझा, तृतीय क्रमांक (सांवतवाडी) अविशाई मार्टीस - सेंट जोसेफ चर्च, (कट्टा - बाजारपेठ मालवण) विजेत्या स्पर्धकांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांसह सर्वांनीच अभिनंदन केले.