पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खा. नारायण राणे यांच्याकडून कोट्यावधींचा निधी

Edited by:
Published on: October 04, 2024 12:17 PM
views 422  views

कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे. अनेक ग्रामीण भागाला जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नव्हती, त्याचप्रमाणे या रस्त्यांमुळे अनेक गाव एका दुसऱ्याला थेट जोडले  जाणार आहेत.

यात मंजूर रस्ते पुढील प्रमाणे आहेत. धालवली फणसगाव रोड तालुका देवगड, साठी ३ कोटी ७४ लाख, पडवणे पालये वाडातर तालुका देवगड, रस्त्यासाठी ३ कोटी ९६ लाख, नेतर्डे डोंगरपाल फकीरफाटा रस्ता तालुका सावंतवाडी, १ कोट ६०,आजगाव तिरोडा  तालुका सावंतवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, लोरे गडमठ रस्ता तालुका वैभववाडी साठी १ कोटी ८९ लाख,निवजे ओझरवाडी ते बामणदेवी मुळदे खुटवळवाडी रस्ता तालुका कुडाळ साठी २ कोटी ७२ लाख असा १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी दिला आहे.