
वैभववाडी : रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील मंदीरा मध्ये अभिषेक करण्यात येणार आहेत.शहरातील दत्तमंदिर,गडमठ गांगेश्वर मंदिर,नापणे गांगेश्वर मंदिर यासह जिल्हा परिषद मतदारसंघातील रामेश्वर मंदिरामध्ये खा.राऊत यांच्या दिर्घायुष्यासाठी अभिषेक सोहळा करण्यात येणार आहे.तसेच रुग्णालयांमध्ये फळे वाटप,महीलांसाठी हळदीकुंकू आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या कार्यक्रमांसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.