खा. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळेत अभिषेक | दिर्घायुष्यासाठी घातलं साकड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 15, 2024 08:02 AM
views 355  views

वैभववाडी :  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे  खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे चव्हाटेवाडी येथील हनुमान मंदिरात अभिषेक करण्यात आला.श्री. राऊत यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्या लाभो आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हावे असे साकडे मारुती चरणी घातले.

खासदार राऊत यांचा वाढदिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.खांबाळे येथील हनुमान मंदीरात  शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी अभिषेक केला.यावेळी सरपंच प्राजक्ता कदम,उपसरपंच गणेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी चेअरमन सुनील पवार,जयेश पवार,  विलास प्रभू,दीपक वसंत पवार मंगेश कांबळे,,विक्रांत पवार,नरेश पालकर,रघुनाथ तळेकर, राजेंद्र पवार,संजय पवार, हरिश्चंद्र पवार,ओंकार पवार आदी  उपस्थित होते.