सावंतवाडी : तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. माडखोल,सांगेली, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये आवाज होऊन भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सावंतवाडीच्या पूर्वेला चार किलोमीटर आणि खाली 5 किलोमीटरवर भुकंपाच केंद्रबिंदू होत. ३ रिस्टर स्केल चा हा भूकंप होता अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. सौम्य हादरे बसल्यान कोणतही नुकसान यात झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यात नुकसान झाल्याच वृत्त अद्याप तरी नाही.