DYSP संध्या गावडेंची ACP म्हणून मुंबईत बदली..!

Edited by:
Published on: February 03, 2024 15:05 PM
views 393  views

सावंतवाडी : येथील डिवायएसपी सौ. संध्या गावडे यांची एसीपी म्हणून मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मात्र अद्याप पर्यंत कोणालाही नियुक्ती देण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकारी म्हणून त्यांना अन्यत्र पाठविण्यात आले आहे. याबाबतचे आदेश आज त्यांना प्राप्त झाले आहेत.

गावडे यांनी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून गेले सहा महिने चांगले काम केले आहे. या काळात त्यांनी पोस्को, अ‍ॅट्रासिटी अशा प्रकरणाबरोबर नुकत्याच सावंतवाडी व वेंगुर्ले येथे झालेल्या धार्मिक तेढ प्रकरणात शांतता राखण्याचे महत्वाचे काम केले होते. अनेक अधिकार्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यापुर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विशेष शाखेत काम केले. तत्पुर्वी गोवा सीबीआयमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली होती. मुंबईत त्यांनी तब्बल २६ वर्षे काम केले होते. आता त्यांना पुन्हा मुंबईत जबाबदारी देण्यात आली आहे.