कावलेवाडीत दत्त जन्म सोहळा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 27, 2023 11:34 AM
views 136  views

देवगड : विश्व गौरवांकित ब्रम्हलीन स्वामी गगनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ब्रह्मलीन स्वामी नामदेव कावले यांचे स्मरण करून श्री दत्त मंदिर कावले जामसंडे-कावलेवाडी येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.  मंगळवार २६डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा होणार आहे.  यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्तमंदिर शांतीदरबार ग्रामस्थ, व महिला मंडळ आणि कावलेवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने आज सायंकाळी ६ वाजता पालखी प्रदक्षिणा आरती, रात्रौ ८ वा. भजन, मंगलमूर्ती भजन मंडळ मळई बुवा प्रशांत कणेरकर ,रात्रौ ९.३० वाजता पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा प्रमोद हरियाण मुंबई बुवा लक्ष्मण गुरव मुंबई यांच्यात होणार आहे. त्यांना मृदंगमणी रवी मेस्त्री आणि मृदंगमणी विजय पालव साथ देणार आहेत. गुरुवार २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक पाद्यपूजा, सायं. ६ वाजता पालखी मिरवणूक, आरती महाप्रसाद, रात्रौ १० वा. लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स ,रात्रौ ११ वाजता आभार प्रदर्शन कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.