सहयोग नाट्यसंल्थेच्या अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे

सचिव मनिषा बामणे,खजिनदार अनुजा पेठकर
Edited by: मनोज पवार
Published on: September 01, 2024 12:21 PM
views 228  views

रत्नागिरी :  पंचवीस वर्षाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या सहयोग नाट्यसंस्थेच्या अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे यांची निवड झाली आहे.संस्थेच्या सचिवपदी मनिषा बामणे आणि खजिनदारपदी अनुजा पेठकर यांची निवड झाली आहे.सहयोग संस्थेची नूतन कार्यकार्णी नुकतीच जाहिर करण्यात आली.

सहयोग नाट्यसंस्थेची स्थापना १९९८ साली करण्यात आली.संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसह अन्य नाट्य आणि एकांकिका स्पर्धा गाजवल्या आहेत.संगीत नाट्य स्पर्धेतही सहयोगचा सहभाग लक्षणीय आहे.मुंबई -दिल्ली पासून कोलकाता पर्यंत सहयोगने नाट्यप्रयोग सादर केले आहेत.संगीत राज्य नाट्य स्पर्धेतील मुंबई आणि पुण्याचे वर्चस्व मोडीत काढून सहयोग नाट्यसंस्थेच्या संगीत मंदारमाला नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता.सहयोगने संगीत मंदारमाला नाटक दिल्लीत सादर करत प्रथम क्रमांक पटकावत कोकणचा झेंडा दिल्लीत फडकवला होता.


सहयोग संस्थेची नूतन कार्यकार्णी झाली असून अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे,सचिव मनिषा बामणे,खजिनदार अनुजा पेठकर सदस्य दत्ता केळकर,राजेश जाधव,संतोष रावणंग आणि महेंद्र मोहिते यांची निवड झाली आहे.सहयोग संस्थेला २५ वर्ष पुर्ण झाली असून पुढील वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचा मानस नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.