पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेले डुमिंग डिसोजांचा राष्ट्रवादीकडून सन्मान

Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 16:42 PM
views 176  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेले श्री डुमिंग डिसोजा यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .पोलीस खात्यामध्ये तब्बल 36 वर्षे सेवा बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल पासून खात्यात सेवेची सुरुवात करून पोलीस हेड कॉन्स्टेबल नंतर ए. एस .आय. व आता पीएसआय या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री डुमिंग डिसूजा यांनी आपल्या परिवारासमवेत उपस्थित राहून सत्कार स्वीकारला. यावेळी

 पोलीस उपनिरीक्षक डिसोजा, सौ कारमेलिन डिसोजा, अँथोनी डिसोजा, रोजी डिसूजा ,सौ मारिता फर्नांडिस, रेमेतीन डायस, क्लारा डिसोजा, फ्रायडे डिसोजा ,मोनिका डिसोजा, जॉनी फर्नांडिस ,फेरमीन  डिसोजा ,अल्बर्ट फर्नांडिस, अँथोनी कारडोस,

 तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायत खान   युवती जिल्हा  अध्यक्ष सावली पाटकर ,सौ पूजा दळवी ,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जहूर खान ,उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, युवकचे अर्षद बेग, वैभव परब, आकाश पांढरे , इमरान शेख सूफीयान इसनाळकर संदीप जाधव आदी उपस्थित होते.