निलेश राणे आगे बढो...!

मालवणात घोषणांनी दुमदुमला परिसर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 27, 2023 19:26 PM
views 244  views

मालवण : भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांचे मालवणात जंगी स्वागत // निलेश राणे आगे बढो....हम तुम्हारे साथ है दिल्या घोषणा // घोषणांनी परिसर गेला दणाणून // दोन दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे केले होते जाहीर // निलेश राणेंच्या या निर्णयानंतर भाजपामध्ये उडाली होती खळबळ // कार्यकर्त्यांनी राजीनामा देत गाठली होती मुंबई // निलेश राणेंनी निर्णय मागे घ्यावा असे केले होते आवाहन // सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत निलेश राणे यांची घेतली होती भेट // भेटीत निलेश राणे यांची केली होती मनधरणी // त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही घेतली होती भेट // दोन्ही नेत्यांनी निलेश राणे यांची मनधरणी करत केली होती नाराजी दूर // कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होता त्यामुळे निलेश राणे होते नाराज // अखेर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून सोडवण्याचा रवींद्र चव्हाण यांनी दिला शब्द // त्यानंतर आज निलेश राणे यांचे सिंधुदुर्गात झाले आगमन // जिल्ह्याच्या सीमेवर बांदा त्यानंतर झाराप, कुडाळ, यासह अनेक ठिकाणी स्वागत झाल्यानंतर सायंकाळी निलेश राणे यांचे मालवण येथे आगमन झाले // भरड नाका येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचे केले जंगी स्वागत // तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक के.पी चव्हाण, आबा हडकर, अशोक तोडणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पंकज सादये, ललित चव्हाण, यासह  मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते होते उपस्थित //