मंत्री उदय सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी उद्या स्वयंभू मंदिरमध्ये दुग्धाभिषेक लघुरुद्रपूजा

उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व तालुका समन्वयक सुनील पारकर यांचं आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 25, 2022 12:18 PM
views 241  views

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राजकीय वाटचाल भरभराटीची व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्या वतीने कणकवली स्वयंभू मंदिरामध्ये सोमवारी सकाळी १०.३० वाजता दुग्धाभिषेक करून लघुरुद्रपूजा आयोजित करण्यात आली  आहे. तसेच लघुरुद्र झाल्यानंतर कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे  ११ वा मांजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन उर्फ भाई   परब यांच्या हस्ते जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी केले आहे