पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे वाहन चालकांची तारांबळ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 06, 2024 13:34 PM
views 212  views

देवगड : देवगड येथीलआठवडा बाजारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अप्रिय घटना घडवून या अनुषंगाने देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडा बाजारात वाहतुकीची कोंडी होऊ नये अथवा व्यापारी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वाहतुकीचे सुयोग्य नियोजन देवगड पोलिसांमार्फत करण्यात आले होते. देवगड मधील गौरी गणपती उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असतना देवगड येथील शुक्रवार आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी भाजीपाला,फळ फळावर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.मुंबईकर चाकरमानी स्थानिक ग्राहक यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला देवगडचा आठवडा बाजार फुलून गेला होता.

वाहतूक पोलीस नाईक प्रवीण सावंत याने यांच्या समवेत पोलीस हवालदार संदीप वाडेकर महिला पोलीस नाईक प्राची धोपटे,कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर,अतिशय सुयोग्य पद्धतीने वाहतुकीचे नियोजन एकेरीमार्ग ,पार्किंग या सर्व सुविधा पालन करून करण्यात येत होते. एकंदरीत श्री गणरायांच्या आगमनाला काही तास बाकी असताना आगमनाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलीस नाईक प्रवीण सावंत यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका भूमिकेमुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. देवगड आठवडा बाजार खालची बाजारपेठ या ठिकाणी भरत असताना एकेरी मार्गाचा वापर हा अधिक प्रमाणात होणे आवश्यक असते ही महत्त्वपूर्ण भूमिका देवगड पोलिसांनी बजावली प्रसंगी संपूर्ण देवगड शहर परिसरात कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये या पद्धतीने वाहने उभी करण्याचे नियोजन देखील करण्यात येत होते देवगड मुख्य बाजारपेठ तालुका शाळा मार्ग त्याचप्रमाणे देवगड ब्राह्मण देव मंदिर मार्ग पवन चक्की या मार्गाने देखील वाहतूक वळविण्यात येत होती वाहतूक पोलिसांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत कोणत्याही अनुचित प्रकार न होता देवगडचा आठवडा बाजार गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शांततेत झाला.