दुकानवाडच्या पशुवैद्यकीय केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गैरसोय

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 27, 2024 05:22 AM
views 45  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पशुवैद्यकिय केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे या केंद्रात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले मनोहर दळवी सुधीर गुंजाळ आदी ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले नेरुर कः नारुर ग्रुप ग्रामपंचायत अखत्यारित दुकानवाड येथे आपला पशुवैद्यकिय दवाखाना असून गेली २० वर्ष सदर पद हे रिक्त आहे. हा गाव अतिशय ग्रामीण भागात असून या दवाखान्याशी बारागाव जोडलेले आहे. येथील लोकांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यबसाय असुन शेती व दुग्ध व्यवसायासाठी गुरांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, तसेच साथीच्या रोगात किंवा दुग्ध व्यवसायात डॉक्टर नसल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. या बाबत आपल्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी यंळावेळी संपर्क साधला असता अद्याप पर्यंत डॉक्टर मिळाला नाही. डॉक्टर मिळण्यासाठी हे उपोषण करण्यात आलेया पशुवैद्यकिय दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टराची तातडीने नेमणुक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली