मुसळधार पावसामुळे डॉ. अनिष स्वार यांच्या दवाखान्याच्या पायर्‍यांचा बेस गेला वाहून

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2024 08:37 AM
views 406  views

सावंतवाडी : बांदा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण होऊन दातांचे डॉक्टर अनिष स्वार यांच्या दवाखान्याच्या पायर्‍यांचा बेस वाहून गेला. यात जीन्याचे मोठं नुकसान झालं आहे. जवळपास ४ लाखाचे नुकसान यात झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान पायर्‍या नसल्यामुळे पुढील १५ दिवस दवाखाना बंद ठेवण्याचा निर्णय डॉ. स्वार यांनी घेतला आहे. दोन दिवसापुर्वी झालेल्या मुसळधार पावसात ही घटना घडली.  बाजूला असलेल्या ओहोळात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही घटना घडली. शासनाकडून याचा पंचनामा देखील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.