दोडामार्ग : तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सर्वसाधारण मासिक बैठक गुरूवार दि. १२ जून रोजी सकाळी ११ वा. दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे.. या बैठकीत आगामी प. स. व जि. प तसेच इतर निवडणुकी बाबत विचार विनिमय तसेच तालुक्यातील अनेक विविध समस्या वर शासना विरोधात आवाज उठविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख कालिदास कांदळगांवकर,जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला जिल्हा संघटीका श्रेया परब, युवा जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, तालुका संपर्क प्रमुख केशव धाऊसकर, सह संपर्क प्रमुख संदिप धर्णे, राजन मौर्य आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीस उपस्थित राहवे असे आवाहन तालुका प्रमुख संजय गवस, महिला ता. प्रमुख श्रेया गवस, युवा सेना ता. प्रमुख मदन राणे, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, महिला जिल्हा उपप्रमुख विनिता घाडी, संपदा देसाई, उपजिल्हा संघटक विजय जाधव, शहर प्रमुख दिवाकर गवस यांनी केले आहे..