१८,१९, २० व २३ नोव्हेंबरला कोरडा दिवस

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 18, 2024 05:36 AM
views 104  views

सिंधुदुर्गनगरी : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये  संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी दारुविक्रीची दुकाने (सीएल-३, एफएल-२, एफएल-बीआर-२, टिडी-१ इत्यादी) अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आदेश दिले आहेत. 

कोरडे दिवस, बंदचा कालवधी पूर्ण जिल्ह्यात याप्रमाणे- दि. 18 नोव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, सायंकाळी 5 वाजलेपासून बंद. 19 नाव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, संपूर्ण दिवस बंद. दि. 20 नोव्हेंबर, 2024 मतदानाचा दिवस,मतदान पूर्ण होईपर्यंत बंद व दि. 23 नोव्हेंबर, 2024 मतमोजणीचा दिवस. आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कळविले आहे.