
सावंतवाडी : सिंधुदुर्गातील दहा हजार ड्रायव्हर गोव्यात मोपा विमानतळावर उदरनिर्वाह करत असताना त्यांना गोवा आरटीओकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन थांबावावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.
सिंधुदुर्गातील ड्रायव्हर मंडळींनी माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन गोव्यात होणाऱ्या त्रासा संदर्भात लक्ष वेधले. यावेळी लवकरच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या मार्गी लावण्यासाठी विनंती करणार आहे. जर समस्या न सुटल्यास आपण पुढील भूमिका ठरवू असा शब्द माजी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित चालकांना दिला आहे.