
सावंतवाडी : क्रिडातपस्वी शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन 22 फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवउद्यान गार्डनमध्ये करण्यात आल आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक यांना बक्षीस व प्रमाणपत्र व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल ताबडतोब जाहीर केला जाईल. स्पर्धेसाठी नाव नोंदणी संतोष परब 9146704663 याच्याशी संपर्क साधावा. 21 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंत नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आव्हान अनिल भिसे मित्रमंडळाचे सदस्य रत्नाकर माळी, बेंजामिन फर्नांडीस, अरुण भिसे, जतीन भिसे, हेमंत केसरकर, ॲन्थोनी फर्नांडीस, दिपक गावकर, अनिल कुडाळकर, गणेश हरमलकर,सल्लागार अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.