युवा रक्तदाता संघटनेकडून डॉ. ऐवळेंचं स्वागत...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 15:36 PM
views 112  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ऐवळे सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.‌ या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. ऐवळेंची भेट घेत त्यांच सावंतवाडीत स्वागत केले आहे. 

यासाठी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पद रिक्त झाल्यानं स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचही लक्ष वेधले होते. येत्या सोमवारी डॉ. ऐवळे पदभार स्वीकारणार आहेत. गेली २७ वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम केले आहे. डॉ. ऐवाळे यांच्याकडे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांचाही पदभार देण्यात यावं यासाठी युवा रक्तदाता संघटनेंनं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांच लक्ष वेधले आहे. यावेळी मेहर पडते, अर्चित पोकळे, सिध्देश मांजरेकर, प्रथमेश प्रभू आदी युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.