डॉ तुपकर्स योगवर्गात योग दिन उत्साहात !

Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 14:02 PM
views 242  views

 सावंतवाडी : जागतिक योगदिनानिमीत्य डॉ तुपकर्स योग क्लासेसतर्फे काडसिध्देश्वर मठ सावंतवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान पतंजलींची प्रार्थना म्हणून आणि प. पू. योगगुरू श्री जनार्दन स्वामी यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून डॉ शुभदा करमरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रास्ताविक क्लास च्या संचालिका डॉ संगिता तुपकर यांनी केले.

डॉ शुभदा करमरकर यांनी योग, आयुर्वेद आणि आहार आणि महिलांचे आरोग्य याबद्दल मार्गदर्शन केले . यानंतर क्लासच्या महिलांनी चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को आॕप बँक प्रायोजक म्हणून लाभले. या बँकेचे व्यवस्थापक श्री विचारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक योगसाधक उपस्थित होते .