डॉ. संतोष गवस यांचा झरेबांबर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

Edited by: संदीप देसाई
Published on: January 29, 2024 14:18 PM
views 123  views

दोडामार्ग : झरेबांबर येथील रहिवाशी व सध्या झोळंबे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षक डॉ. श्री संतोष ज्ञानेश्वर गवस यांचा प्रजासत्ताक दिनी ग्रुप ग्रामपंचायत झरेबांबर यांच्यावतीने  शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

डॉ. संतोष गवस यांना सन २०२३ - २४ या वर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा  उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच  अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार , बेळगाव येथील आधार सोशल फाउंडेशन ( महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ) या संस्थेचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक प्रेरणा गौरव पुरस्कार व  अथमश्री  सांस्कृतिक प्रतिष्ठान दिल्ली या संस्थेचा इंटरनॅशनल आयकॉन ॲवार्ड २०२३ हे पुरस्कार त्यांना या वर्षी देऊन गौरविण्यात आले आहेत. त्याचबरोबर सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्याचा मराठा समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

त्याचबरोबर संतोष गवस यांना यावर्षी तामिळनाडू येथील विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबच  सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. एस्. आर. दळवी फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर टॉक फोरम शाखा दोडामार्गचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच ते शिक्षक संघटनेच्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.

त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनी ग्रुप ग्रामपंचायत झरेबांबर यांचे वतीने डॉ. संतोष गवस यांचा शालश्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सरपंच अनिल शेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच स्नेहा गवस, उपसरपंच शाम नाईक, ग्रामपंचायत सदस्य नीता नाईक, संजना आजरेकर, अंकिता साळगावकर, राधिका सावंत, उमेश सातार्डेकर, झिलू शेळके, पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत, ग्रामसेवक देसाई, माजी ग्रामविस्तार अधिकारी रामा ठाकूर, मनोज नाईक, ज्ञानेश्वर गवस तसेच शिक्षक , अंगणवाडी सेविका , आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.