डॉ. सई धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बढती झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बढती झाली आहे.
Edited by: प्रसाद पातडे
Published on: September 26, 2023 22:04 PM
views 1111  views

सिंधुदुर्ग:डॉ. सई धुरी ह्या तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली झाल्यानंतर डॉ. सई धुरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी प्रभारी म्हणून काम पाहत होत्या.

राज्य शासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील बदल्यांचा शासन आदेश आज मंगळवारी जारी केला आहे या आदेशानुसार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बढती झाली आहे.