आकर्षण आणि वासना यातील फरक समजून घ्यावा : डॉ. रुपेश पाटकर

Edited by:
Published on: February 18, 2025 16:55 PM
views 171  views

कळणे :  प्रेम, आकर्षण आणि वासना या तीन भिन्न भावना आहेत. त्यांना प्रेम समजण्याची चूक कुमारवयीन मुलं करतात. त्यामुळे पालकांसह मुलांनी देखील आपल्याला वाटणारी भावना नेमकी कोणती, ती हाताळायची कशी हॆ समजून घ्यायला हवे, असे मत मनोविकार तज्ञ् डॉ. रुपेश पाटकर यांनी कळणे येथील कार्यक्रमात केले.

आडाळी -फोंडीये ग्रुप ग्रामपंचायत व ग्लोब ट्रस्ट आडाळी यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेलेंटाईन डे चे औचित्य साधून प्रेम म्हणजे काय? याबाबत मार्गदर्शन सत्र कळणे नूतन विद्यालयात आयोजित केले होते. यावेळी डॉ. पाटकर यांनी मार्गदर्शन केले. आडाळी सरपंच तथा ट्रस्ट चे अध्यक्ष पराग गांवकर, मुख्याध्यापक महेंद्र देसाई उपस्थित होते. 

डॉ. पाटकर म्हणले ' कुमारवयिन वय हॆ फार संवेदनशील असते. या वयात एखादी भिन्नलिंगी व्यक्ती अचानक आवडायला लागते, तीव्रपणे आवडायला लागते, तिचा सहवास हवाहवासा वाटतो, ही एक भावना आहे, नैसर्गिक भावना आहे, पण ती भावना म्हणजे प्रेम नव्हे. या भावनेला प्रेम समजून बसण्याची आणि त्यासाठी चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे, म्हणून ही भावना आणि प्रेम यांच्यातील फरक कुमारवयीन मुलांनी समजून घेतला पाहिजे. 

प्रेम, आकर्षण आणि वासना या तीन भिन्न भावना आहेत. या तिनही भावनांना प्रेम समजून बसण्याची चूक कुमारवयीन मुलांकडून घडू शकते. आजच्या मोबाईलच्या जमान्यात जिथे फसवे रुप घेऊन कोणीही तुमच्याशी संपर्क करु शकतो, अशावेळेस कुमारवयीन मुलांनी भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असणे गरजेचे आहे. 

श्री. गांवकर म्हणाले ' व्हेलेंटाईन डे ' म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असा मर्यादित अर्थ तुमच्यासमोर असतो. पण खरं तर शालेय जीवनात या दिवशीपासून आपण प्रेम भावना म्हणजे काय?  आकर्षण व वासना म्हणजे काय यातील फरक समजून घ्यायला सुरवात करायला हवी, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. सूत्रसंचालन व आभार देसाई यांनी मानले.

आडाळी ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम ! 

माझ्या सुमारे वीस वर्षाच्या कारकिर्दीत किशोरवयीन मुलांना समंजस घडविण्याचे असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणारी आडाळी ग्रामपंचायत ही पाहिली ग्रामपंचयत आहे, असे कौतुक डॉ. पाटकर यांनी केले.