
सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. मी मुलांना सांगतो अल्पसंतुष्ट राहू नका, मी स्वतः आत्मसंतुष्ट नाही. मी भारत @100 चं बोलतेय. 2047 मधील भारतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. मी 2047 मध्ये असेन असं वाटतं नाही. पण, मी देवाकडे एक मागण मागेन, मी जरी गेलो तरी मला एक दिवस 2047 मधला द्यावा. मला पृथ्वीतलावर पाठवाव, हे हसू बघायला असं मत अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं.