डॉ. मुरली चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या

सेवाभावी संघटनांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: October 17, 2023 12:46 PM
views 150  views

सावंतवाडी : डॉ. मुरलीमनोहर चव्हाण हे 2011- 12 मध्ये सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज मधून बीएएमएस ही पदवी घेऊन 2015 पासून आजपर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये निस्वार्थ व निशुल्कपणे रुग्णांची सेवा करत आहे. कोरोना काळामध्ये त्यांच खूप मोठं योगदान आहे. कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या या उत्कृष्ट सेवाभावी कामगिरीबद्दल कोविड योद्धा म्हणून  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. चितारी यांच्या हाताखाली त्यांनी बरीच वर्षे प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे पेशंटला योग्य पद्धतीने हाताळण्याचं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.

 विमान प्रवासामध्ये मुंबई एअरपोर्टवर एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता. त्या व्यक्तीची पस देखील भेटत नव्हती थोडक्यात ती व्यक्ती मृत्यूच्या दारातच होती अशावेळी  डॉ. मुरली चव्हाण यांनी  तत्काळ प्राथमिक उपचार करून त्या व्यक्तीला जीवदान दिले होते. असे बरेच पेशंट त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. चितारी यांच्या मार्गदर्शनाखाली बरे केले व अजूनही  निस्वार्थपणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते रुग्णांना सेवा देताना दिसतात. रात्री बे रात्री कधी पण कॉल आल्यानंतर ते तत्काळ सामाजिक कार्य किंवा रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू होतात तसेच  इमर्जन्सी च्या वेळी 24 तास रुग्णांना सेवाही देतात. काही दिवसापूर्वी सावंतवाडी मध्ये झाड पडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यावेळी तत्काळ घटनास्थळी पोहोचून  त्या युवकांना वाचविण्याचे शर्यतीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या अशा या तत्परसेवेमूळे शहरातील सामाजिक संघटना नेहमीच त्यांच कौतुक करत असतात.   

सावंतवाडी शहरातील रक्तदाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचं डॉ.मुरली यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन बनावे म्हणून त्यांना सेवेत कायम रुजू होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभते तसेच मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष तरबेज बेग, मोशिन मुल्ला, सोहाब बेग हे देखील त्यांना वेळोवेळी चांगले सहकार्य करत असतात. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व युवा रक्तदाता संघटना यांच्यासोबत देखील ते अनेकदा सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात. अ

सा समाजसेवेचा भान असणारा देवदूत सारखा डॉ. मुरली चव्हाण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमचा लाभावा जेणेकरून शहरांमध्ये समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्यांची साथ मिळू शकेल व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. म्हणून अशा प्रकारचे डॉक्टर हातातून निसटू नयेत याकरिता सावंतवाडी शहरातील नागरिकांसहित विविध संघटनेची मागणी आहे. त्यासाठी या विषयासंदर्भात शहरातील अनेक सेवाभावी संघटनेेंमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती रवी जाधव यांनी दिली.