डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत RPD च्या योगेशला सुवर्णपदक

Edited by:
Published on: April 13, 2025 12:12 PM
views 132  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचेकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२४-२५ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कु· योगेश विवेकानंद जोशी हा विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून योगेशची निवड VIVA (तोंडी) परीक्षेसाठी निवड झाली होती. या परीक्षेमध्येही कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक कमावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे..

कु. योगेश याने दैनंदिन जीवनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा उपयोग या विषयावरील कृती संशोधन प्रकल्प सादर केला होता. इ. ०६ वी मध्येही योगेशने अशीच सुवर्ण कामगिरी केली होती आणि पुन्हा एकदा इतिहासाची सुवर्ण पुनरावृत्ती करणाऱ्या या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल योगेश तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालकवर्ग या शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच प्र.मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपमुख्याध्यापक एस . एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.