डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळच्यावतीने मोफत नेत्र तपासणी !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 24, 2024 11:38 AM
views 319  views

कुडाळ : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ मार्फत शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत गरीब रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व पिवळं रेशन कार्ड धारक असलेल्या पहिल्या 15 रूग्णांची बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया जिल्ह्यातील सहा ही केंद्रांवर मोफत होणार आहेत. व इतर रुग्णांची सुद्धा सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे हे शिबिर कुडाळ सावंतवाडी मालवण कणकवली वेंगुर्ला देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय परिवारातर्फे  डॉ. गिरीश गद्रे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेंद्र म्हेत्रे उदय दाभोलकर उपस्थित होते. 


गेली आठ वर्ष हा उपक्रम आपण राबवत असून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत आला आहोत. मागील आठ वर्षात शेकडो गरजू व्यक्तींच्या शस्त्रक्रिया आम्ही केल्या आहेत . असे यावेळी बोलताना डॉक्टर गिरीश गद्रे यांनी सांगितले.


तसेच कणकवली शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत गीत रामायण या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान मठ येथे शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले आहे.


या गीतरामायण कार्यक्रमासाठी झी मराठी सारेगमप सुप्रसिद्ध गायक कलाकार अभिषेक पटवर्धन, अमोल पटवर्धन, आसावरी जोशी यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी  निवेदक म्हणून लाभणार आहेत. रसिक श्रोत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. गिरीश गद्रे नेत्र रुग्णालय परिवारातर्फे कऱण्यात आले आहे