सावंतवाडी कॉटेजच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 15:05 PM
views 235  views

सावंतवाडी: उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले त्यांना आहेत. डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे गेली अनेक वर्षे सावंतवाडी, दोडामार्ग भागात रुग्णसेवा देत आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणेच जनतेत त्यांनी आपलं स्थान निर्माण केले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी डॉ. ऐवळे यांच अभिनंदन करत कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत