डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्मशानभूमीची साफसफाई

अनोख्या उपक्रमाने सरपंचाचे कौतुक
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 15, 2023 14:02 PM
views 91  views

कणकवली : कणकवली  तालुक्यातील   घोणसरी गावात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मागासवर्गीय स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत घोणसरी सरपंच  मॅक्सी पेद्रु पिंटो, घोणसरी सोसायटी चेअरमन दीपक पुंडलिक राणे,ग्रामपंचायत सदस्य  सतीश सिताराम जाधव, महेश दत्ताराम येंडे, सचिन बुधाजी सुतार  व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मागासवर्गीय वस्तीतील  जाधव गुरुजी, चंद्रकांत जाधव , सिताराम तांबे,  निशांत कदम , किशोर जाधव, संजना जाधव , सुरेखा जाधव ,मनीषा साळसकर इत्यादी उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा पद्धतीने स्मशानभूमीची साफसफाई झाल्याने अनोख्या उपक्रमाची गावातील सरपंच  मॅक्सी  पिंटो यांचे कौतुक होत आहे.