डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सावंतवाडीत रक्तदान शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2024 14:36 PM
views 54  views

सांवतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे हिमालयाच्या उंची सारख विशाल आहे. तर ज्ञानाची खोली ही अथांग महासागरा सारखी आहे. मात्र त्यांना विशिष्ट जातीय गोवण हे दुर्देवी आहे. डॉ. बाबासाहेबांची जयंती ही विचारांचा जागर म्हणून साजरा व्हायला हवा, असे प्रतिपादन सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक तानाजीराव नारनवर यांनी येथे केले. बौध्दिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती , सावंतवाडी यांच्या वतीने येथील समाज मंदिर सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेले रक्तदान शिबीराच्या उद्गाटन समारंभात श्री. तानाजीराव नारनवर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  तर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक  ज्ञानेश्वर ऐवळे कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी होते. प्रारंभी श्री. नारनवर व डॉ. ऐवळे यांच्या हस्ते  तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष केशव जाधव ,उपाध्यक्ष  जगदीश चव्हाण , सचिव विनायक जाधव, खजिनदार लक्ष्मण कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. नारवनर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कर्तुत्वाचा आढावा घेऊन डॉ. बाबासाहेबांची जयंती हा सार्वजनिक कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर डॉ. ऐवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधन रक्तदानसारखा पवित्र  उपक्रम राबवून या समितीने राबविलेला उपक्रम हा स्तुत्य असल्याचे सांगून समन्वय समितीला सर्वते  सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी सुमारे २५ रक्तदाताने  रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सगुण जाधव यांनी केले. तर केशव जाधव, जगदीश चव्हाण यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार  विनायक जाधव यांनी मानले. यावेळी उपस्थित डॉ. सागर जाधव ,प्राजक्ता रेडकर, राजेंद्र गोरा, मानसी बागेवाडी,अनिल खाडे, सिध्दार्थ पराडकर ,बाबली गवंडी त्याचप्रमाणे समन्वय समिती सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.