
बांदा : जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ. बी. बी. गायतोंडे हे बांद्याचे भूषण होते. येथील शैक्षणिक, आरोग्य सुविधासाठी त्यांनी दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले.
बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, संचालक सुधीर साटेलकर, शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी डॉ. गायतोंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभार राकेश केसरकर यांनी मानले.